spot_img

Mangalprabhat Lodha : ​मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आमदाराने दिली जीवे मारण्याची धमकी !

spot_img

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

मुंबईतील घुसखोर बांग्लादेशींचा (Bangladeshi infiltrators) मुद्दा उचलून धरणारे मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शेख यांच्या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणीतील हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सध्या तिकडे अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु आहे.प्रशासनाने त्या भागात पहिल्या टप्प्यात 9 हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमण मुक्त केला असून कारवाई अद्याप सुरूच आहे.

एकीकडे मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असताना आमदार अस्लम शेख मालवणीत अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून ते मुंबईच्या सुरक्षेशी खेळत आहेत.हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. मात्र स्थानिक आमदार अस्लम शेख हे सातत्याने समाज विघातक शक्तीला अभय देत असून भारतीय संविधानाच्या मुल्यांना ठेच पोहचविण्याचे काम करत आहेत.तसेच घुसखोर बांग्लादेशींच्या अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात सातत्याने अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत पाठपुरावा करत असल्यानेच त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून आपण तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ