spot_img

Workplace Relationships : भारतात कार्यस्थळावरील प्रेमसंबंधांचा वाढता ट्रेंड काय आहे संपूर्ण प्रकरण

spot_img

दर चारपैकी एकजण सहकाऱ्याशी रिलेशनमध्ये; जगात भारत दुसऱ्या स्थानावर

दिवसाचा सर्वात मोठा काळ कार्यस्थळी जात असल्याने, सहकाऱ्यांशी संबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता वाढते. ताणतणाव, स्पर्धा, व्यस्त वेळापत्रक आणि घरी संवादाचा अभाव यामुळे अनेकांना ऑफिसमधील व्यक्तीच भावनिक आधार देताना दिसते. परिणामी ‘ऑफिस अफेअर’ ही आता काही दुर्मिळ गोष्ट राहिलेली नाही.

अलीकडील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून या बाबतीत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ११ देशांतील १३ हजारांहून अधिक प्रौढांवर करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार भारत ऑफिस अफेअरमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील १० पैकी ४ कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले.

या यादीत मेक्सिको ४३% सह अव्वल असून, भारत ४०% सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांत हे प्रमाण ३०% च्या आसपास आहे. विशेष म्हणजे मुंबईसारख्या महानगरांमध्ये प्रवासातील वेळ, घरातील संवादाची कमतरता आणि व्यावसायिक ताणतणावामुळे हे नाते अधिक वेगाने जुळताना दिसतात.

या सर्व्हेमध्ये मानसिकतेतील फरकही स्पष्ट झाला

पुरुषांमध्ये अशा नात्यांचे प्रमाण : ५१%

महिलांमध्ये : ३६%
महिलांपैकी अनेकांना करिअरवर होणाऱ्या परिणामांची चिंता असल्याने त्या असे रिलेशन टाळतात.

तरुणांमध्येही (१८-२४ वयोगट) सावधगिरीची भावना दिसते. जवळपास ३४% तरुणांना ऑफिस अफेअर त्यांच्या व्यावसायिक भविष्यावर परिणाम करू शकते, असे वाटते. जनरेशन Z मध्ये व्यावसायिक मर्यादांचे भान अधिक असल्याचे हे निदर्शनास येते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ