spot_img

Maharashtra Politics : बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मिळाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी !

spot_img

काँग्रेसने नाकारला होता विशाल काकडेचा उमेदवारी अर्ज.

पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या युवा शहर अध्यक्षास राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे.चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडेवर पत्नी नमिता काकडेने 9 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर विशाल काकडेला अटक करण्यात आली. तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र विशाल काकडेने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 13 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल काकडेने न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशाल काकडे (Vishal Kakade) आणि नमिता काकडे यांचा 2020मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. नमिता ही नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला पतीवर संशय आहे. त्याचे इतर मुलींशी अफेअर असावे असे तिला वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद सुरु होते. एकदा नमिताने विशालला याविषयी विचारले तर त्याचा राग टोकाला पोहोचला. त्याने पत्नीचा अंगावर पेट्रोल (Petrol) ओतले. नंतर तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. नमिताने प्रसंगावधान राखत पेट्रोलने भिजलेली साडी पाण्याने भिजवली. त्यामुळे तिचा जीव वाचला. या प्रकरणानंतर संपूर्ण चिखली शहरात खळबळ माजली होती. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकणारा काँग्रेसचा युवा शहर अध्यक्ष आहे. आता त्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ