spot_img

Shinath Chaudhary : विरोधकांच्या टीकेमुळे काशिनाथ चौधरींच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती !

spot_img

काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश रोखण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले.

पालघरच्या गडचिंचले इथं साधुंच्या हत्याकांडामधील आरोपी काशिनाथ चौधरी याच्या भाजप प्रवेशाची दखल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेत, त्या निर्णयाला स्थगिती दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पालघर भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र लिहत माहिती दिली आहे. काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेय. गडचिंचले साधू हत्याकांड (Gadchinchale sadhu case) प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अशातच भाजपमध्ये काशिनाथ चौधरी यांनी प्रवेश केल्यानंतर राज्यभरातून विरोधकांकडून गंभीर आरोप करत टीकेची झोड उठवण्यात आली होती. दरम्यान आता वाढता विरोध लक्षात घेता भाजप पक्षश्रेष्ठीने आता काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती दिली आहे.

पालघर साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक पातळीवर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाच्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही FIR किंवा चार्जशीटमध्ये त्यांचं नाव नाही, तरीही विषयाचा गांभीर्याने विचार करून काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला प्रदेश पातळीवरून तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे. अशी माहिती भाजप नेते आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली आहे.

भाजपचे (BJP) रवींद्र चव्हाण यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, “पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या काशिनाथ चौधरी यांच्याबाबत पालघर साधू हत्याकांडाशी संबंधीत चर्चा पुन्हा प्रसिद्धी माध्यम व सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करुन तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ