i-20 कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांनी दिल्ली हादरली; पुलवामा–जैश कनेक्शन समोर
10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी दिल्लीच्या लाल किल्ला (Red Fort)परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने राजधानीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली. तपास यंत्रणांनी प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट केले की हा साधा अपघात नसून काळजीपूर्वक आखलेला कार बॉम्बस्फोट होता. या हल्ल्याचा मागोवा घेताना तपासकर्त्यांचे धागेदोरे थेट जम्मू–काश्मीरमधील (Jammu and Kashmir)पुलवामा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेपर्यंत पोहोचले. हल्ल्यासाठी आर्थिक मदतही जैशकडूनच प्राप्त झाल्याची माहिती पुढे आली.
या स्फोटात 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले, तर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कटात काही उच्चशिक्षित डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. मेडिसिनमध्ये एमडी केलेल्या काही डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांत कटाची आखणी केली होती.
पुलवामाचा रहिवासी दहशतवादी उमर मोहम्मद स्फोटकांनी भरलेली i-20 कार चालवत होता. त्यांचे मूळ लक्ष्य दिल्ली नव्हे तर अयोध्या व वाराणसी असल्याची माहिती तपासात स्पष्ट झाली. मात्र गडबडीत कारला लाल किल्ला परिसरातच स्फोट झाला. उमरही गाडीत असल्याने त्याचाही मृत्यू झाला.
एनआयएच्या (AI) तपासात या i-20 कारचा मालक डॉ. उमर नबी असल्याचे निष्पन्न झाले. पंपोरच्या संबूरा गावचा रहिवासी असलेला नबी हा संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली. कारचे व्यवहार करण्याच्या बहाण्याने तो काही दिवसांपूर्वीच दिल्लीला आला होता. ही कार अनेक वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विकली–खरेदी करण्यात आली होती आणि शेवटी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार झाला होता.
स्फोटाच्या दिवशी ही संशयित कार जवळपास 11 तास दिल्लीतील विविध भागांत फिरत होती, आणि त्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवण्यात आली होती. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या दहशतवादी कटाची अधिक धक्कादायक माहिती उघड होत आहे.




