spot_img

Nivedita Saraf on Bihar Election : बिहारमध्ये भाजपचा दणदणीत विजय; अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

spot_img

95 जागांवर भाजप आघाडीवर; विजयावर निवेदिता सराफ आणि महेश कोठारे (Mahesh kothare) यांच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय

बिहार (Bihar election)विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर बाजी मारत राज्यभर उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. निकाल जाहीर होत असताना भाजप 95 जागांवर आघाडीवर राहिला आणि त्यामुळे या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांच्यामागोमाग नितीश कुमार यांच्या जेडीयूने 82 जागांवर विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले.

भाजपच्या (BJP) या विजयाचा सर्वत्र बोलबाला होत असताना आता मराठी चित्रपटसृष्टीतूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमात भाजपबद्दल आपलं स्पष्ट मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. “मी तर कट्टर बीजेपी समर्थक आहे, त्यामुळे हा विजय माझ्यासाठी खास आनंदाचा क्षण आहे,” असे त्यांनी सांगितले. हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

यापूर्वी दिवाळी पहाट कार्यक्रमात दिग्दर्शक-कलाकार महेश कोठारे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं भरभरून कौतुक केलं होतं. “मी मोदीजींचा भक्त आहे… मुंबई महापालिकेतही कमळच फुलेल,” असे त्यांनी आत्मविश्वासाने म्हटले होते.

महेश कोठारे यांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? कलाकारांनी लक्षात ठेवावं की त्यांच्या प्रेक्षकांमध्ये फक्त भाजपचे लोक नसतात,” अशा शब्दांत राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ