spot_img

Mumbai Local Train : रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; प्रवाशांनो लोकल वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा निर्णय घ्या!

spot_img

मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर कामे; काही लोकल रद्द तर काही गाड्या जलद मार्गावर वळवल्या जाणार

मध्य रेल्वेवर येत्या रविवारी मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आधीच वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर या तिन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे केल्यामुळे काही गाड्या रद्द तर काही मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारी प्रवासात गर्दी आणि विलंबाची शक्यता आहे.

मुख्य मार्गावर मेगाब्लॉक

सीएसएमटी–विद्याविहार या दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत अप व डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक असेल.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल या काळात जलद मार्गाने वळवल्या जातील, त्यामुळे त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील.

घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकलदेखील विद्याविहार–सीएसएमटी दरम्यान अप फास्ट मार्गावर धावतील आणि तेच जलद मार्गावरील थांबे असतील.

हार्बर मार्गावरील बदल

पनवेल–वाशी दरम्यान (पोर्ट लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायं. 4.05 या वेळेत मेगाब्लॉक असेल.

पनवेल–सीएसएमटी मार्गावरील सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळातील अप लोकल रद्द राहतील.

सीएसएमटी–बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेतील डाऊन लोकलही रद्द असतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर परिणाम

पनवेल–ठाणे या अप ट्रान्स-हार्बर लोकल 11.02 ते 3.53 या वेळेत रद्द राहतील.

ठाणे–पनवेल या डाऊन लोकल 10.01 ते 3.20 या वेळेत रद्द राहतील.

पर्यायी व्यवस्था

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी–वाशी विभागात विशेष लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच ठाणे–वाशी/नेरूळ मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा सुरू राहतील.
पोर्ट मार्ग देखील या काळात नेहमीप्रमाणे उपलब्ध असेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ