spot_img

Pune Leopard attacks : बिबट्याची दुचाकीवर झडप; दुचाकीस्वार गंभीर जखमी

spot_img

दुचाकीस्वार तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे (Pune) जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले आणि मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने धावत्या दुचाकीवर झडप मारली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.ही घटना दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओतूरजवळील अहिनवेवाडी फाटा येथे घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव बाळू सीताराम डोके (वय 34 वर्षे) असे आहे. पीडित तरुण हा पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाणचा रहिवासी आहे.

या घटनेबाबत ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे माहिती देताना म्हणाले की, “बाळू डोके (Balu Doke) हा तरुण बुधवारी अहिल्यानगर-कल्याण महामार्गाने दुचाकीवरून जात होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अहिनवेवाडी फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झडप मारली. त्यामुळे बाळू डोके हा दुचाकीस्वार खाली पडला आणि दुचाकीसह काही अंतर रस्त्यावर फरफटत गेला. बाळू या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आळेफाटा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान सदरची घटना घडल्यानंतरही बिबट्याने त्याच ठिकाणी रात्री उशिरा पुन्हा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना लक्ष करून, झडप मारल्याचे येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे,वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी जखमी डोके यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली व विचारपूस केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ