spot_img

Delhi Bomb Blast : लाल किल्ला स्फोटाचा कट उधळला; पुलवामातील मुख्य आरोपीचं घर उडवलं 

spot_img

एन्क्रिप्टेड अ‍ॅपवरून दहशतवादी नियोजन; देशभरात छापे, तीन कार जप्त

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Delhi Red Fort) झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला मोठं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद (Dr. Omar Mohammed) याचे पुलवामा येथील घर सुरक्षा दलांनी नियंत्रित स्फोट करून नष्ट केले. दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

तपासादरम्यान अनेक महत्त्वाच्या धागेदोऱ्यांचा उलगडा होत आहे. फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये स्फोटाशी संबंधित आणखी एक संशयास्पद कार सापडली. ही गाडी डॉ. शाहीन शाहिद यांच्या नावावर असून, “व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल” प्रकरणात त्याला आधीच अटक झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यापीठात सापडलेल्या मारुती ब्रेझा कारची जम्मू-काश्मीर पोलिस तपासणी करत आहेत. इतर वाहनांचीही पडताळणी सुरू आहे.

तपासात उघड झाले की डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग अ‍ॅप वापरून संपूर्ण दहशतवादी कारवाईचे नियोजन केले होते. स्फोटस्थळावरून मिळालेल्या डीएनए चाचणीत लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढरी हुंडई i-20 कार डॉ. उमर चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, हरियाणातील नुहमध्येही छापेमारी झाली असून, पिनांगवा येथे खत-बियाणे विक्रेता एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी एनपीके खत मोठ्या प्रमाणात याच दुकानातून घेतल्याचा संशय आहे. याशिवाय, फरिदाबादच्या खंडावली गावातून लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार जप्त करण्यात आली आहे. ती गावात पार्क करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक करून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तपासात उघड झाले आहे की दहशतवादी गटाने आयईडी वाहतूक आणि लपवण्यासाठी एकूण तीन कार खरेदी केल्या होत्या. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीतील सर्व पोलीस स्टेशन, चौक्या आणि सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ