NIA कडे दिला जाणार तपास
देशाची राजधानी नवी दिल्ली (Delhi Blast) लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाला. त्या कारमधील स्फोटानंतर इतर वाहनांना आग लागली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीतील या घटनेत 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सहा हून अधिक गाड्यांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलांना सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी स्फोटाची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशन दलांची वाहनं घटनास्थळी रवाना झाली होती. राजधानी नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये कारचा स्फोट झाला. या घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी सुरक्षा यंत्रणा दाखल झाली आहे. तर, नवी दिल्ली, मुंबई, लखनौसह विविध शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाहनाचा स्फोट मेट्रो स्टेशनमधील गेट क्रमांक 1 च्या पार्किंगमध्ये झाला आहे. त्यानंत इतर गाड्यांना आग लाली. गेट क्रमांक 1 चा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. दिल्लीत ज्या ठिकाणी स्फोट झाला तो परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी विशेष पथकं दाखलं झाली. दहशतवाद विरोधी पथकं, सायबर गुन्ह्यांसदर्भातील पथकं त्या ठिकाणी पोहोचली.दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी म्हटलं की या घटनेचा बारकाईनं तपास केला जात आहे. हा सामान्य स्फोट नाही. दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले की “स्फोटाची चौकशी होत आहे, हा सामान्य स्फोट नाही. सायंकाळी 6.52 मिनिटांनी एक धिम्या गतीनं एक कार आली आणि रेड लाईटवर थांबली. आणि त्यात स्फोट झाला. स्फोटामुळं आजूबाजूच्या वाहनांचं नुकसान झालं. सर्व यंत्रणा एफएसएल, एनआय घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे.तर, काही जण जखमी झाले आहेत. या घटनेवर नजर ठेवून आहोत.”
दिल्ली स्फोट प्रकरणी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. सकाळी साडेसात वाजल्यापासून बैठक सुरू होती. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये दिल्ली पोलीस कमिशनर, एन आय ए महासंचालक, आयबी चे संचालक, गुप्तहेर खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आंतरिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आदी बैठकीला उपस्थित होते .जवळपास सव्वा पाच तास चाललेल्या बैठकीत फरीदाबाद मॉड्यूल आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा पुढील तपास एनआयए कडे देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून लवकरच हा तपास NIA ला सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




