spot_img

Amol Mitkari and Rupali Patil Thombare News : अजित पवारांकडून अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरेंवर मोठी कारवाई !

spot_img

रुपाली पाटील ठोंबरे,अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Ajit Pawar) प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत होता. तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती.याबाबतचं पत्रक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त, कोणाला संधी?

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ