spot_img

Yogita Gawali Pregnant : अरुण गवळी होणार आजोबा,’या’ मराठी अभिनेत्याच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा !

spot_img

योगिताचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. 

महाराष्ट्राला आणि त्यातही मुंबईकरांना अरुण गवळी हे नाव माहीत नाही असं होणार नाही. डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी 2020 साली लग्न केलं होतं. अभिनेता अक्षय वाघमेरेची (Akshay Waghmare) पत्नी योगिता दुसऱ्यांदा गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाचे (Baby Shower) फोटो समोर आले आहेत. या डोहाळे जेवणाच्या फोटोंनी लक्ष वेधलंय. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत अक्षयने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. अक्षय वाघमेरेची पत्नी योगिता म्हणजे, कुख्यात डॉन, माजी आमदार अरूण गवळीची (Arun Gawli) दुसरी कन्या. कुख्यात डॉन अरुण गवळी आणि त्यांची पत्नी आशा गवळी आता आजी-आजोबा होणार आहेत. योगिताचा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. थाटामाटात पार पडलेल्या बेबी शॉवरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

अक्षय वाघमारे मराठी सिनेमात काम करत असून योगिता पेश्याने वकिल असून एक संस्था चालवते. गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारेनं गेल्या वर्षी 8 मे रोजी आपली लग्नगाठ बांधलेली. लॉकडाऊनमधील सर्व नियमांचं पालन करुन लग्न पार पडलेलं. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांचा लग्नसोहळा दगडी चाळीतच पार पडलेला. अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे आणि इतर समारंभाचे फोटो शेअर केले होते. 2019 च्या डिसेंबर महिन्यातच दोघांचा साखरपुडा झालेला. तेव्हाच लग्नाची तारीखही नक्की करण्यात आलेली. 29 मार्च 2020 मध्ये लग्न होणार होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अचानक लॉकडाऊन लागलं आणि लग्न पुढे ढकललेलं. अखेर 8 मे 2020 रोजी दोघांचा लग्नसोहळा पार पडलेला होता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ