spot_img

Bacchu Kadu : प्रहारच्या बच्चू कडूंची कोकणातील राजकारणात एंट्री ?

spot_img

रत्नागिरी नगरपरिषदेसाठी प्रहार मैदानात !

महाराष्ट्र राज्यात ज्याची राजकीय घटकांना कमालीची प्रतीक्षा होती, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ‘बिगुल’ वाजले आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्याने राज्यभरात आता आचारसंहिता सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, यासाठी स्थानिक पातळीवर अनेक राजकीय घटकांनी आपल्या घरातील देवही कदाचित पाण्यात ठेवले असावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील (MVA) मित्रपक्षाने एकत्र लढायचं कि स्वतंत्र हे अद्याप ठरताना दिसत नाहीये. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी करत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अनेकांच्या मुलाखती घेणे सुरु केलं आहे. तर कोकणातील राजकारणात आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची एंट्री होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

प्रहार जनशक्ती पक्ष आता रत्नागिरी नगरपरिषदची निवडणूक लढवणार असून 5 ते 6 जागांवर प्रहार जनशक्ती आपले उमेदवार उभे करणार,अशी माहिती प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली आहे. तर पुढे बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियांवर देखील संताप व्यक्त केलाय. आपण मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे. सगळे नामर्दाची अवलाद आहेत. मशीन समोर करतात, मशीन मधून चोरी करतात. प्रामाणिकतेचे मत कुठे राहतं? संविधानात अधिकार दिला आहे आपण कुणाला मत दिलं हे जाणून घेण्याचा. मात्र आज मत कुणाला दिलं हे आपल्याला कळत नाही. याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकतो का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे, अशी शंका बच्चू कडूंनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ