spot_img

Mumbai CSMT Protest : रेल्वे कर्मचारी संघटना NRUM च्या नेतृत्वात आंदोलन छेडलं पुढे…

spot_img

मुंब्रा अपघातातील अभियंत्यांवर दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांचा आंदोलनमुद्रा; लोकल गाड्या ठप्प ठेवल्याने ठाणे-मुलुंड दरम्यान प्रवाशांची प्रचंड गैरसोय

मुंब्रा (Mumbra) रेल्वे अपघातातील दोन अभियंत्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक आंदोलन छेडल्याने ठाणे (Thane) आणि आसपासच्या स्थानकांवर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सीएसएमटी स्थानकावर दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू करून कामबंद आंदोलन केलं. परिणामी, दादर आणि सीएसएमटी येथे लोकल गाड्या थांबवण्यात आल्या आणि लोकल सेवा विस्कळीत झाली.

लोकल बंद राहिल्याने ठाणे व मुलुंड स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत काही प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना लोकलची धडक बसून खाली पडल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वे कर्मचारी संघटना NRUM च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. संध्याकाळी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आणि स्थानकांवर गाड्या थांबवून निषेध नोंदवला. जरी संघटनेने लोहमार्ग पोलिसांना फक्त शांततेत निषेध नोंदवण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं, तरी आंदोलन अचानक तीव्र झालं. पोलिसांनी या आंदोलनाला मूक परवानगी दिली होती.

रेल्वे प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चेनंतर अखेर सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. रेल्वे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले की, “डीआरएम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असून गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.”

दरम्यान, ९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जखमी झाले होते. तपासादरम्यान दोन अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेचं काम वेळेत न केल्यामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्यामुळे वरिष्ठ सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांच्यावर जीआरपीने गुन्हा दाखल केला होता. त्याच विरोधात हे आंदोलन उभं राहिलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ