spot_img

Pune Crime News : घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक,आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत !

spot_img

घरफोडी करणारे अट्टल चोर जेरबंद

दिवाळी सणाच्या (Diwali festival) सुरूवातीस जुन्नर, खेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती. 9 ऑक्टोबर रोजी पुण्यातील जुन्नर येथील मंगरूळ भागातील विक्रम महादू डेरे हे बाहेरगावी गेले असता,दुपारच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराचे कुलूप फोडून घरात लाखोंची चोरी झाली. त्याच अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सदरची मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या.या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला. घटनास्थळाची पाहणी करून चोरीच्या घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती. त्याचबरोबर गुन्हे पद्धत एक सारखीच होती. या गुन्हयामध्ये सुमारे 100 किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. गुन्ह्यामध्ये एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरील 2 संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल ही अहिल्यानगरच्या दिशेने गेली होती. संशयित मोटार सायकलचा व आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन कडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित मोटार सायकल ही यूनिकॉर्न मोटार सायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले, किशोर हापूस भोसले दोघे रा. कासाटी, आष्टी, जि. बीड हे वापरत असून त्यांनीच घरफोडी केली असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीसांचे तपास पथक (Police investigation team) हे आरोपीचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने, आळेफाटा परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी मोहन भिकाजी भोसले, किशोर हापूस भोसले यास युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनीच चोरी केल्याचे उघडकीस झाले. त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्यांनी आळेफाटा नारायणगाव,मंचर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून एकूण 7 तोळे सोने, 180 ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सायकल असा एकूण सुमारे 8 लाख 50 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो.नि. विश्वास जाधव, मंचर पो स्टे चे पोनि श्रीकांत कंकाळ, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि प्रविण सपांगे, स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार, पोसई अमित सिदपाटील, अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, हेमंत विरोळे, संदिप बारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, आळेफाटा पो स्टे चे श्रेणी पोसई सतिश टाव्हरे, अमित म्हाळुंजे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, नवीन आरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ