spot_img

Apaar Card : अपार कार्डमुळे आता विद्यार्थ्यांना विमान प्रवासात मिळणार मोठी सूट !

spot_img

केंद्र सरकारचे विद्यार्थ्यांना खास गिफ्ट

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) मोठा निर्णय घेतला आहे. आता अपार कार्डच्या फायद्याचा परिघ वाढवण्यात आला असून अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना विमान तिकीटात घसघशीत सूट मिळणार आहे. अपार कार्डच्या माध्यमातून आजवर विद्यार्थी-विद्यार्थिनींना रेल्वे, बस, ग्रंथालयात सवलत मिळत होती. पण आता यात विमान सेवेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व एअरलाईन्सशी त्यासंबंधीची बोलणी सुरु आहे. देशभरात सध्या 31.56 कोटी विद्यार्थांच्ये अपार कार्ड तयार झाले आहेत.

अपार कार्डचे फायदे पुढीलप्रमाणे –

विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत दाखला घेताना, देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपार कार्डचा डेटा वापरता येईल. अपार आयडी, अपार 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित होईल. विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. विद्यार्थ्यांचा त्यांच्या 12 अंकी क्रमांकाच्या आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.अपार कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य धरण्यात येईल.अपार कार्डमुळे (Apaar Card) विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालय, ग्रंथालयात मोफत प्रवेश मिळेल. सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पट‍वून त्यांना मोफत पुस्तकं आणि वह्यांचा पुरवठा करण्यात येईल. त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होईल. यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार आयडी महत्त्वाचा असेल. त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.सरकारी विद्यार्थी वसतीगृहात आणि विविध खासगी वसतीगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार कार्ड महत्त्वाचे असेल. त्याआधारे सवलत मिळेल.देशभरात शाला शैक्षणिक सहली आयोजन करतात. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ