spot_img

Gold : सोन्याचे भाव का वाढतात ? सोने महागले तरी लोक का खरेदी करतात ?

spot_img

सोन्याचे भाव नेहमीच वाढलेले असतात. सणवार असल्यावर लोक आवर्जून सोन्याच्या (Gold) दागिन्यांची खरेदी करतात. पण, सोन्याचे वाढते भाव पाहता दागिने खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या खिशाबाहेरच झालं आहे. सध्या सोन्याचा भाव हा जवळपास रुपये 1,30,000 पर्यंत पोहोचला आहे. अशावेळी सर्वसामान्य लोकांना एक प्रश्न नेहमी सतावतो की, सोनं इतकं महाग का असतं की ज्यामुळे त्याची किंमत लाखांपर्यत जाते. काय विशेष असत सोन्यात ? चला तर मग जाणून घेऊयात सोनं मी महाग होण्यामागील कारण..!

सोन्याचा वापर हा फार पूर्वीपासून केला जातो. पूर्वी सर्वात जास्त राजे-महाराजे दाग-दागिने वापरायचे. त्यांच्या दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर हा अधिक होता त्याबरोबरच ते नाण्यानमध्ये (Coin) देखील सोन्याचा वापर केला जायचा. आजही तितक्याच आवडीने लोक सोन्याचे दागिने घालतात. सोनं या धातूला महिलांची विशेष पसंती असते. दुर्मिळ आणि निसर्गात कमी प्रमाणात आढळणाऱ्या गोष्टी महाग मिळतात, सोने हा त्यांपैकीच एक आहे. सोने निसर्गात फार कमी प्रमाणात आढळते त्यामुळे जगभरात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, म्हणून सोनंं महाग मिळतं. सोनं जगात कुठेही मिळालं तरी ते शोधणं दुर्मिळ असतं. सोनं मिळवण्यासाठी खाण खणावी लागते सोबतच खाण खणायला भरपूर मनुष्यबळ लागते. सोनं मिळवल्यानंतर शुद्ध करून त्याला आकार द्यावा लागतो आणि या संपूर्ण प्रक्रियेला भरपूर पैसे मोजावे लागतात.

सोन्याची किंमत हि त्याच्या खाणकाम आणि शुद्धीकरणाच्या खर्चावर अवलंबून असते. सोन्यावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. त्याबरोबरच सोनं धातूला दुर्गंधी येत नाही व सोन्याला गंज चढत नाही. सोन कितीही महागाल तरी लोकांची त्याला कायम पसंती राहणार..

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ