spot_img

Mumbai Megablock : प्रवाशांनो घराबाहेर निघताना नियोजन करून निघा, जाणुन घ्या कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक!

spot_img

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक; प्रवाशांना सहकार्याचे आवाहन

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे अविरत धावत असली, तरी तिलाही दुरुस्ती आणि देखभालीसाठी थोडा वेळ हवा असतो. याचसाठी मध्य रेल्वेने उद्या, रविवारी, उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला आहे, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभाल कामे हाती घेतली जाणार असून, प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक:
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या माटुंगापासून धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील आणि साधारण 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणेनंतर या गाड्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. तसेच, ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद गाड्याही मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर धावतील, ज्यामुळे त्या 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रान्स हार्बर लाईनवरही प्रभाव:

ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असेल. यामुळे या मार्गावरील सर्व अप आणि डाऊन गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. ठाण्याहून वाशी, नेरुळ, पनवेलकडे जाणाऱ्या आणि पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.पश्चिम रेल्वेची स्थिती:
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ब्लॉक असेल, परंतु रविवारी कोणताही ब्लॉक जाहीर करण्यात आलेला नाही.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या बदलांचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे. मेगाब्लॉकमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ