spot_img

Cm Devendra Fadnavis : साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ; दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

spot_img

डॉ. संपदा मुंडे यांच्या सुसाईड नोटमुळे पोलीस खात्यात हादरे, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे (Sampada Munde) यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, PSI गोपाल बदने (Gopal Badne) आणि पोलीस प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांना त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. या प्रकरणाने साताऱ्याच्या पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.सूत्रांनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही काळापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या तणावाखाली होत्या. याच दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर छळ आणि अत्याचाराचे थेट आरोप केले आहेत.या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी दोन्ही आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या प्रकरणाला गती येण्याची शक्यता आहे.गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सातारा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “या घटनेत जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल,” असे भोयर यांनी स्पष्ट केले.ही घटना सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक असून, या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ