spot_img

MNS Diwali Dipotsav Mumbai: शिवाजी पार्कमधील आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीला पर्यटकांची गर्दी, पण सरकारकडून मनसेच्या योगदानाची दखल नाही

spot_img

मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये गेल्या १३ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आयोजित करत असलेला दीपोत्सव हा मुंबईकरांसह दूरदूरच्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा दीपोत्सव दरवर्षी शिवाजी पार्कला (Shivaji Park) नटतोय, जिथे चमकणारी रोषणाई आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळते. विशेष म्हणजे, मनसेने हा उत्सव पूर्णपणे अराजकीय ठेवत, केवळ लोकांना आनंद मिळावा हाच उद्देश ठेवला आहे. मात्र, यंदा राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने या दीपोत्सवाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केल्याने मनसेने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हँडलवर शिवाजी पार्कमधील दीपोत्सवाची छायाचित्रे शेअर करत, “दिवाळीत मुंबईतील हा उत्कृष्ट अनुभव घ्या” असे आवाहन पर्यटकांना केले. पण या पोस्टमध्ये मनसेच्या योगदानाचा उल्लेखही नाही, ज्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मनसेने यावर तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देत म्हटले, “१३ वर्षांपासून आम्ही हा उत्सव यशस्वीपणे करतोय, पण सरकारला आमचे छोटेसे श्रेय देण्याचीही तसदी नाही. नाशिकमधील आमच्या उपक्रमाचेही असेच श्रेय सरकारने लाटले होते. सत्ताधारी पक्षाची ही कार्यपद्धती आता उघड झाली आहे.

“मनसेने पुढे ठणकावले की, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित अभिजात कार्यक्रम असो वा दीपोत्सव, असे लोकांना आनंद देणारे उपक्रम ते भविष्यातही करत राहणार आहेत. “आम्ही असे कार्यक्रम इतके भव्य करू की पर्यटन विभागाला पुन्हा त्याचे श्रेय घ्यावेसे वाटेल, पण तेव्हा किमान आमच्या पक्षाला श्रेय द्या,” असे मनसेने सुनावले.हा वाद असा पेटला असताना, शिवाजी पार्कमधील दीपोत्सव यंदाही मुंबईकरांचा उत्साह वाढवत आहे. पण सरकारने मनसेच्या या अनोख्या योगदानाची दखल घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ