spot_img

Sharad Pawar Baramati Mcdonald’s : बारामतीमध्ये McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र

spot_img

 मॅकडी सुरु करणाऱ्या इरा पवारांचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक !

शरद पवारांच्या बारामतीमध्ये मॅकडोनाल्डचे नवीन आऊटलेट (McDonald outlets in Baramati) सुरु झाले आहे. इरा पवार यांनी बारामतीमध्ये हे McDonald आऊलटलेट सुरु केलं आहे. दरम्यान, इरा पवार यांच्या McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र जमल्याचे पाहायला मिळेल.इरा पवार यांच्या McDonald आऊलटलेटच्या उद्घाटनाला पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार असा सारा गोतावळा जमला होता. अशातच या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील हजार असल्याचे बघायला मिळाले आहे.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ‘इरा पवार, तुझा खूप अभिमान आहे!’ असे कॅपशन्स मध्ये लिहले आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की इरा पवार नेमक्या कोण आहेत? राजकीय कुटुंबातल्या मात्र राजकारणापासून फार लाम असलेलं नाव म्हणजे इरा पवार.’इरा पवार’ (Era Pawar) या आमदार रोहित पवार यांची चुलत बहीण आहेत. त्या राजेंद्र पवार यांचे बंधू रणजीत पवार यांच्या कन्या आहेत. तर शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचीही नातं आहे. या वेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनीही मॅक डीच्या आऊटलेटला भेट देऊन इरा पवार यांना शुभेच्छा दिल्या. नुकतेच सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील पहिल्यावहिल्या McDonald आऊटलेची पाहणी केली होती. त्यांनतर आता या आऊटलेटचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ