जाळीदार अनारसे बनवण्यासाठी काही खास टीप्स
देशभरात दिवाळीची धामधूम दिसून येत आहे. लोक खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. कपड्यांपासून ते घराच्या सजावटीपर्यंत विविध साहित्याची जोरदार खरेदी केली जात आहे. दिवाळीमध्ये आणखी एक गोष्टीची घाई दिसून येते. ती म्हणजे फराळ बनवण्याची. दिवाळीत फराळाला विशेष महत्व आहे. फराळामध्ये लाडू, चिवडा आणि चकलीसोबतच अनारसेसारखे अनेक वेगवेगेळे पदार्थ बनवले जातात.मस्त गोड चवीचा, सुंदर, नाजूक जाळीदार, कुरकुरीत अनारसा खाणे याहून मोठे सुख नाही.अनारसा बनवण्यासाठीचा एवढा घाट घातल्यानंतरही काहीवेळा हे अनारसे (How To Make Perfect Aanarasa) फसतात. अनारसे बनवणं हे अत्यंत नाजूक काम आहे ते अत्यंत बारकाईने करणे महत्वाचे असते.अनारसे तळताना विरघळतात, जाळीदार बनत नाहीत, पीठ कच्च राहत, पीठ भुसभुशीत होत असे होऊ नये म्हणून अनारसे बनवताना नेमकी कोणती काळजी घ्यावी त्यासोबतच अनारसे बनवायची कृती पाहुयात.
अनारसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तांदूळ – 2 कप
दही – 1 टेबलस्पून
तीळ – 2-3 चमचे
साखर पावडर – 3/4 कप
देशी तूप – तळण्यासाठी
अनारसा बनविण्याची कृती
चवदार अनारसा बनवण्यासाठी प्रथम तांदूळ दोन ते तीन दिवस पाण्यात (किमान 48 तास) भिजत ठेवा. अनारसेसाठी लहान नवीन तांदूळ वापरणे चांगले. तांदूळ भिजवताना दर 24 तासांनी पाणी बदलावे.ठरलेल्या वेळेनंतर तांदूळातील पाणी काढून टाकावे व भिजवलेले तांदूळ जाड कापडावर पसरून सुकविण्यासाठी सावलीच्या जागी ठेवावे.जेव्हा तांदळातील बहुतेक पाणी सुकते जेणेकरून ओलावा टिकून राहील, तेव्हा तांदूळ मिक्सरच्या साहाय्याने जाडसर बारीक करा आणि एका भांड्यात काढा. यानंतर, हे पीठ चाळणीने चाळून घ्या आणि एका बाऊलमध्ये काढून ठेवा. त्यानंतर पिठात पिठीसाखर आणि थोडं तूप घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर दही घालून चांगले एकजीव करा, आणि त्याच्या मदतीने पीठ घट्ट मळून घ्या. यानंतर, 10 ते 12 तास पीठ बाजूला झाकून ठेवा.ठरलेल्या वेळेनंतर पीठ घेऊन परत एकदा चांगले मळून घ्या. यानंतर पिठाचे छोटे गोळे करून तीळात टाका. जेव्हा तीळ कणकेभोवती चांगले चिकटतात तेव्हा ते आपल्या तळहातामध्ये दाबा आणि सपाट करा. अशाप्रकारे सर्व अनारसे बनवून तयार करा. यानंतर एका पातेल्यात देशी तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा. तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात अनारसे टाका आणि अनारसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर हे अनारसे थंड होऊ द्या. अशाप्रकारे चविष्ट अनारसे तयार आहेत. हे अनारसे तुम्ही हवाबंद डब्यात महिनाभर साठवून ठेवू शकता.
जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे बनवण्यासाठी काही खास टीप्स
1.गुळाचा पाक जास्त घट्ट किंवा पातळ नको, एकतारीच हवा.
2.अनारसाचं पीठ जितकं वेळ झाकून ठेवू, तितके अनारसे खुसखुशीत होतील.
3.अनारसे नेहमी मध्यम आचेवर तळा. जास्त आचेमुळे पटकन काळपट होतील.
4.एकदा करून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडतील!




