Tukaram Mundhe : “तिरंगा रॅली”त विद्यार्थ्यांच्या विजयापेक्षा तुकाराम मुंढेंच्या नावाचीच चर्चा; धडाकेबाज कारवाईमुळे बनले तरुणांचे खऱ्या अर्थाने हिरो!

spot_img

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जनआंदोलनामुळे मंत्र्याला गमवावे लागले पद; ‘तिरंगा रॅली’त आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नावाच्या बॅनर्सनी वेधले लक्ष।

देशभर गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणातील तीव्र जनआक्रोश आणि ‘जेन झी’ (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर केंद्र सरकारला युवाशक्तीपुढे नमावे लागले आहे. या दबावाखाली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असून, मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या जनआंदोलनामुळे मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरली आहे. या मोठ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत आज (रविवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली दादरच्या शिवाजी पार्कवर भव्य ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही (प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून) या मोर्चाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

या भव्य जल्लोषादरम्यान मुंबईत झळकलेल्या एका बॅनर्सने विशेष लक्ष वेधले आहे, ते म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे! सध्या राज्यात ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम आक्रमकपणे राबवून अवैध धंदे आणि भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या पारदर्शक आणि धाडसी कामामुळे ते पुन्हा एकदा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत, ज्याचे पडसाद या मोर्चात दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे शिवाजी पार्क परिसरात जनसागर उसळला असून, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी शिवसेना भवनाकडून शिवाजी पार्ककडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ