New Delhi : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या शिष्टमंडळात बैठक; राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने मागितली उद्यापर्यंतची मुदत

spot_img

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह तीन प्रमुख मागण्यांवर चर्चा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आणि मदतीबाबत सरकार सकारात्मक

राजधानी दिल्लीत ‘नीट’ (NEET) परीक्षा आणि विविध मुद्यांवरून पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनावर आता केंद्र सरकारसोबत थेट बोलणी सुरू झाली आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर आता सीजेपीनेही आपल्या मागण्या सरकारसमोर ठामपणे मांडल्या आहेत. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अद्याप तिढा कायम असून, यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे.

बैठकीत सीजेपीच्या वतीने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, ज्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, २० जुलै रोजी संसद परिसर व जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांचा त्यात समावेश आहे.

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि आर्थिक मदतीच्या घोषणेबाबत सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे; परंतु शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची मुदत मागितली आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांनीही आपल्या व्हिडिओ संदेशात, आयुष्यभर पाठीशी राहणारे गुन्हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू नयेत, यावर भर दिला आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा आणि आंदोलन यापुढेही असेच सुरूच राहील, असा इशारा CJP कडून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ