Yash Chopra : ‘ऐ मोटी, मुझसे शादी कर ले…’; यश चोप्रांच्या हजार प्रपोजल्सवर अभिनेत्री मुमताज यांनी का दिला होता नकार?

spot_img

चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा, पण आईची भूमिका साकारण्यास जुन्या जमान्यातील ‘ब्युटी क्वीन’चा ठाम नकार

१९७० च्या दशकात आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री मुमताज आज बॉलिवूडपासून दूर असल्या, तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले किस्से आजही चाहत्यांमध्ये तितकेच आवडीने वाचले जातात. ‘दो रास्ते’, ‘बंधन’ आणि ‘खिलौना’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या मुमताज त्या काळी केवळ चित्रपटांमुळेच नव्हे, तर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांमुळेही प्रसिद्धीझोतात असायच्या. त्यातीलच एक सर्वात जास्त गाजलेला किस्सा म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा आणि मुमताज यांच्यातील नाते.

नुकत्याच समोर आलेल्या जुन्या मुलाखतींच्या हवाल्यानुसार, यश चोप्रा मुमताज यांच्या प्रेमात वेडे होते आणि त्यांनी अनेकदा मुमताज यांना लग्नासाठी मागणी घातली होती. यश चोप्रा यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत मुमताज यांनी स्वतः यावर एक मोठा आणि रंजक खुलासा केला होता. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, ‘यश चोप्रा यांनी तुम्हाला खरोखर प्रपोज केले होते का?’ तेव्हा मुमताज यांनी हसत उत्तर दिले, “त्यांनी मला लग्नासाठी एकदा नाही, तर कदाचित १००० वेळा विचारले असेल. ते नेहमी मला गंमतीने ‘ऐ मोटी, आय लव्ह यू यार… मुझसे शादी कर ले…’ असे म्हणायचे. परंतु, मी त्यांच्या प्रस्तावाचा कधीच स्वीकार केला नाही, कारण माझे त्यांच्यावर कधीच प्रेम नव्हते. मी त्यांचा नेहमी एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आदर केला, पण त्या पलीकडे आमच्यात काहीच नव्हते.”

मुमताज यांनी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले, मात्र त्यांनी सिनेसृष्टीतील कोणत्याही व्यक्तीला आपला जोडीदार बनवले नाही. १९७४ मध्ये त्यांनी व्यावसायिक मयूर माधवानी यांच्याशी लग्न केले आणि त्या लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यांना दोन मुली आहेत. मुमताज बरीच वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर आहेत, परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुमताज यांनी स्पष्ट केले की, त्या बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहेत, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि लूकला साजेसा रोल असेल तरच त्या काम करतील. आजच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना थेट ‘आई’ किंवा ‘काकू’च्या भूमिका ऑफर केल्या जातात, अशा पारंपरिक आईच्या भूमिका साकारण्यास मुमताज यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ