Toxic Release Date : ऑगस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर महासंग्राम! ‘केजीएफ’ फेम यशच्या ‘टॉक्सिक’शी भिडणार श्रद्धा कपूरचा ‘ईथा’

spot_img

फादर्स डेच्या मुहूर्तावर सुपरस्टार यशकडून नव्या रिलीज डेटची घोषणा; अवघ्या दोन दिवसांच्या फरकाने दोन्ही चित्रपट थिएटर्समध्ये धडकणार

‘केजीएफ’ स्टार यश याच्या ज्या चित्रपटाची जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोअन-अप्स’ (Toxic) या बहुप्रतीक्षित चित्रपटाची नवी अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. याआधी मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट काही तांत्रिक आणि आंतरराष्ट्रीय वितरणाच्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. आता फादर्स डेचे औचित्य साधत यशने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करून हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. ऑगस्टअखेरीस ओणम, रक्षाबंधन आणि वरमहालक्ष्मी व्रत यांसारखे मोठे सण एकापाठोपाठ एक येत असल्याने, या सुट्ट्यांच्या काळाचा ‘टॉक्सिक’ला बॉक्स ऑफिसवर मोठा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे.

परंतु, यशच्या या महाकाय चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरळ टक्कर देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सज्ज झाली आहे. ‘स्त्री २’च्या तुफान यशानंतर श्रद्धाचा आगामी ‘ईथा’ (Eetha) हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी, म्हणजेच ‘टॉक्सिक’ रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील लावणी आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असून, नुकताच थिएटर्समध्ये लीक झालेल्या याच्या जबरदस्त टीझरने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये श्रद्धा एका गर्भवती लोककलावंताच्या भूमिकेत दिसत असून तिच्या या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे. एका बाजूला तब्बल ८०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेला यशचा ‘टॉक्सिक’ आणि दुसऱ्या बाजूला तगडी स्टारकास्ट असलेला श्रद्धा कपूरचा ‘ईथा’ यांच्यातील हा थेट सामना ऑगस्ट २०२६ मध्ये बॉक्स ऑफिसवर कोणती नवीन गणिते मांडणार, याकडे आता संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ