Janhvi Kapoor Peddi Controversy : ‘पेद्दी’ चित्रपटातील बोल्ड सीन्सवरून नवा वाद; जान्हवी कपूरचे कथित चॅट्स लीक

spot_img

कॅमेरा अँगलवरून जान्हवीने नोंदवला होता आक्षेप; वाद वाढल्याने दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी मागितली जाहीर माफी

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि साऊथ सुपरस्टार रामचरण यांचा ‘पेद्दी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवत असला, तरी सध्या हा चित्रपट एका वेगळ्याच वादात अडकला आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरच्या दृश्यांवरून सोशल मीडियावर तीव्र आक्षेप घेतले जात आहेत. जान्हवीला केवळ अंगप्रदर्शनासाठी वापरण्यात आल्याची टीका प्रेक्षक आणि सेलिब्रिटी करत असतानाच, आता अभिनेत्रीचे काही खासगी चॅट्स लीक झाले आहेत. या चॅट्समुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर मोठा वाद झाला होता आणि स्वतः रामचरणने जान्हवीची बाजू घेत दिग्दर्शकाला सुनावले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लीक झालेल्या चॅट्समध्ये नेमके काय आहे?

व्हायरल झालेल्या कथित चॅट्सनुसार, जान्हवी कपूरने ‘पेद्दी’ चित्रपटातील तिच्या काही विशिष्ट दृश्यांवर आणि चुकीच्या कॅमेरा अँगलवर तीव्र आक्षेप घेतला होता. तिने पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान छाती आणि कंबरेचे आक्षेपार्ह शॉट्स न वापरण्याची विनंती केली होती. ३० ऑक्टोबर २०२५ च्या एका मेसेजमध्ये जान्हवीने लिहिले आहे की, “मी दिग्दर्शकांना असे शॉट्स न घेण्यास सांगितले होते. राम सर खूप चांगले आहेत, ते दिग्दर्शकावर ओरडले आणि म्हणाले की तू तिचे असे शॉट्स पुन्हा कधीही काढणार नाहीस.” रामचरण देखील या प्रकारामुळे प्रचंड नाराज झाले होते. आणखी एका मेसेजमध्ये जान्हवीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तिच्या अनुभवाबद्दल भाष्य करताना म्हटले की, “दक्षिणेत हे अनेकदा घडते.” ‘गेम चेंजर्स’ चित्रपटात कियारा अडवाणीच्या पात्रावर झालेल्या टीकेशी तुलना करताना जान्हवी म्हणाली, “इथे कॅमेरा अँगल त्याहूनही वाईट होता, पण राम सरांनी स्पष्ट नकार देत ते थांबवले. मी कोणत्या मानसिक त्रासातून गेले, याची कोणाला कल्पना नाही.” सेटवर पालकांच्या उपस्थितीबाबत बोलताना तिने स्पष्ट केले की, जर तिचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी या विषयात हस्तक्षेप केला असता, तर परिस्थिती आणखी बिघडली असती.

हा वाद सोशल मीडियावर पेटल्यानंतर ‘पेद्दी’ चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी अधिकृत पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. कोणत्याही महिला पात्राचा अपमान करण्याचा किंवा तिला केवळ एक वस्तू म्हणून दाखवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट करत त्यांनी चित्रपटातील ते वादग्रस्त सीन्स बदलणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

बॉक्स ऑफिसवरील तगड्या कमाईच्या आनंदात ‘पेद्दी’च्या टीमसाठी हा वाद डोकेदुखी ठरला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सहकलाकार म्हणून रामचरणने घेतलेल्या भूमिकेचे आणि जान्हवीला दिलेल्या पाठिंब्याचे नेटीझन्सकडून प्रचंड कौतुक केले जात आहे. आता दिग्दर्शकांनी सीन्स बदलण्याची घोषणा केल्यामुळे या वादावर पडदा पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ