Gold Silver Rate : सलग घसरणीनंतर सोनं महाग, चांदी 2.66 लाखांवर; जळगावात दर पुन्हा वाढले

spot_img

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव काही काळासाठी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्याचा परिणाम देशातील आर्थिक बाजारपेठांवर दिसून येत आहे. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असतानाच सोनं आणि चांदीच्या दरांनीही पुन्हा जोरदार उडी घेतली आहे. सलग तीन दिवस घसरण अनुभवलेल्या बुलियन बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळाली.

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीतही 5 हजार रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा दर 2 लाख 66 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. कालच्या तुलनेत बाजारात झालेल्या या वाढीमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचंही लक्ष पुन्हा मौल्यवान धातूंकडे वळलं आहे.

काल जळगावमध्ये एक तोळे सोनं 1 लाख 51 हजार रुपयांवर व्यवहार करत होतं, तर चांदीचा दर 2 लाख 61 हजार रुपये प्रति किलो इतका होता. आजच्या तेजीमुळे दोन्ही धातूंनी पुन्हा उच्च स्तर गाठला आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) दरानुसारही सोन्याच्या भावात वाढ नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 27 मे रोजी 1 लाख 56 हजार 72 रुपये होता, तो आज वाढून 1 लाख 57 हजार 43 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दिवसात जवळपास 971 रुपयांची वाढ झाली आहे. 23 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असून बाजारात तेजीचं वातावरण कायम असल्याचं दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. जानेवारी 2026 मध्ये दोन्ही धातूंनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर दर घसरले होते. मात्र, जागतिक घडामोडी आणि अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढू लागल्याने बाजारात उत्सुकता वाढली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ