Govinda Wife Controversy Trailer Launch : गोविंदाच्या पत्नीने जाहीरपणे उडवली पतीची थट्टा; शिल्पा शेट्टीच्या नव्या शोच्या ट्रेलर लाँचमध्ये सुनिता अहुजाचे वादग्रस्त वक्तव्य

spot_img

लग्नाच्या ३७ वर्षांनंतर संसारात खटके उडत असल्याच्या चर्चांना उधाण; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुनिताला केले प्रचंड ट्रोल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या ‘माँ है ना’ या आगामी कॉमेडी आणि कुकिंग शोच्या मुंबईतील ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा हिने पतीबद्दल केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या शोच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या सुनिताने पापाराझींशी संवाद साधताना “बकरी है” असे म्हटले, ज्यावर मागून आलेल्या “तो तुमचा नवरा आहे” या कमेंटवर तिने हसत “माझा नवरा बकरी नाही, बकरा आहे” अशी जाहीर मस्करी केली. तिचे हे बोलणे ऐकून शेजारी उभी असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियाही थक्क झाली आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुनितावर जोरदार टीका करत “गोविंदामुळेच तुझे अस्तित्व आहे आणि तू त्याचीच खिल्ली उडवतेस” अशा शब्दांत तिला सुनावले आहे. गेल्या काही काळापासून लग्नाच्या ३७ वर्षांनंतर या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या आणि ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू असून, सुनिताने यापूर्वीही “पुढच्या जन्मी असा नवरा नको” असे म्हटल्यामुळे त्यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ