Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन; चिमुकलीचं नावही सांगितलं

spot_img

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांच्या आयुष्यात आनंदाचे नवे पर्व सुरू झाले आहे. गुरुवार, ७ मे रोजी देविशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, या आनंदाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास क्षणानंतर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपल्या मुलीची झलक शेअर करत तिच्या नावाचीही घोषणा केली.

सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर पत्नी आणि नवजात मुलीसोबतचा एक भावूक फोटो पोस्ट केला. हा फोटो रुग्णालयातील असल्याचे बोलले जात असून, मुलीला घरी आणल्यानंतर काही दिवसांनी हा खास क्षण टिपण्यात आला. पोस्टसोबत त्याने “भेटा आमच्या सर्वात मोठ्या आनंदाला, रिद्धिमाला” असा संदेश लिहिला. त्यामुळे त्यांच्या मुलीचे नाव ‘रिद्धिमा’ असल्याचे स्पष्ट झाले. या नावाची घोषणा होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि क्रिकेटविश्वातील अनेक मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

‘रिद्धिमा’ हे संस्कृत भाषेतील सुंदर आणि अर्थपूर्ण नाव मानले जाते. या नावाचा अर्थ प्रेम, समृद्धी, यश आणि सुदैवाशी जोडला जातो. अनेक चाहत्यांनी या नावाचे कौतुक करत ते अत्यंत सकारात्मक आणि भावनिक असल्याचे म्हटले आहे. काहींनी हे नाव देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीशी संबंधित असल्याचेही नमूद केले.

दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातील या आनंदाच्या क्षणातही सूर्यकुमार यादव आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसला. इंडियन प्रीमियर लीग दरम्यान तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यासाठी रायपूर येथे पोहोचला. याआधी मुंबई विमानतळावर त्याने पत्रकार आणि पापाराझींना मिठाई वाटल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ