Health Tips : तुमच्या किचनमधील ‘हे’ ३ पदार्थ ठरतायत ‘स्लो पॉयझन’

spot_img

डायबिटीज, फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराला आमंत्रण देणाऱ्या रोजच्या सवयी बदला

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आरोग्यासाठी कर्दनकाळ ठरत आहेत. कमी वयात जडणारा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे विकार यांमागे आपल्या किचनमधील काही घातक घटक कारणीभूत आहेत. जर तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी राहायचे असेल, तर सर्वात आधी तुमच्या ताटातून ‘रिफाईंड शुगर’ (पांढरी साखर) हद्दपार करा. साखरेमध्ये केवळ रिकाम्या कॅलरीज असून कोणतेही पोषक तत्व नसते. ही साखर थेट लिव्हरमध्ये जाऊन फॅटमध्ये रूपांतरित होते आणि सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे, तिचे व्यसन लागते, ज्यामुळे शरीराची मागणी सतत वाढत राहते.

साखरेसोबतच डॉक्टरांनी ‘रिफाईंड ऑईल’ पासून दूर राहण्याचा कडक सल्ला दिला आहे. कारखान्यांमध्ये २००°C तापमानावर प्रोसेस होणाऱ्या या तेलातील सर्व चांगले घटक नष्ट होतात आणि केवळ शरीराला घातक ठरणारे ट्रान्स फॅट्स आणि फ्री रेडिकल्स शिल्लक राहतात. हे तेल हृदयाच्या धमन्या (Arteries) बंद करण्यास आणि कर्करोगाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरते. याशिवाय, तिसरा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘पॅकेज्ड फूड’. चिप्स, नूडल्स, बिस्किटे आणि पाकिटातील ज्यूसमध्ये मिठाचे (सोडियम) प्रमाण प्रचंड असते. हे पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात वापरले जाणारे प्रिजर्वेटिव्ह्स आणि आर्टिफिशिअल फ्लेवर्स तुम्हाला त्यांचे कायमचे गुलाम बनवतात. सुरुवातीला या गोष्टी बंद करणे कठीण वाटले तरी, हळूहळू त्यांचे प्रमाण कमी केल्यास तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ