Sonam Kapoor Second Child Name : सोनम कपूरने धाकट्या मुलासाठी निवडलं खास नाव, नावामागचा अर्थही सांगितला

spot_img

बॉलीवूडची स्टाइल आयकॉन आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर हिने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोनम आणि तिचे पती आनंद आहुजा यांना 29 मार्च 2026 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट करत आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे.

सोनमच्या पहिल्या मुलाचं नाव ‘वायू’ असून, आता दुसऱ्या मुलाचं नावही भारतीय संस्कृती आणि हिंदू पुराणांशी जोडलेलं असल्याचं दिसून आलं. अभिनेत्रीने आपल्या नवजात बाळाचं नाव ‘रुद्रलोख कपूर आहुजा’ असं ठेवलं आहे. दोन्ही मुलांसोबतचे सुंदर फोटो शेअर करत तिने या नावामागील भावना आणि अर्थ चाहत्यांना सांगितला.

पोस्टमध्ये सोनमने लिहिलं की, एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या कृपेने तिच्या मुलाचा जन्म झाला आणि हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी दैवी आशीर्वादासारखा आहे. मोठ्या भावासोबतचं हे नवीन नातं आणि आयुष्याने दिलेली ही अमूल्य भेट असल्याचं तिने भावनिक शब्दांत व्यक्त केलं.

‘रुद्रलोख’ या नावाचा अर्थही अभिनेत्रीने स्पष्ट केला. वेदांमध्ये ‘रुद्र’ हा शब्द शक्ती, ऊर्जा आणि परिवर्तनाचं प्रतीक मानला जातो. दुःख दूर करणारी, नवजीवन देणारी आणि उपचाराची ताकद असलेली दैवी ऊर्जा म्हणजे ‘रुद्र’, असं सोनमने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘रुद्रलोख’ या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ