Pune News : पाटस रेल्वे स्थानकावर थरार; ट्रॅकवर झोपल्याने महिलेचा जीव थोडक्यात बचावला

spot_img

पाटस रेल्वे स्थानक येथे घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेसमोर अचानक रेल्वे आल्याने क्षणभर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र प्रसंगावधान राखत संबंधित महिलेने तातडीने रेल्वे ट्रॅकवर झोपण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रुळ ओलांडत असताना वेगाने रेल्वे येताना दिसली. पळून जाण्यास वेळ नसल्याचे लक्षात येताच तिने ट्रॅकच्या मधोमध झोप घेतली. काही क्षणांतच संपूर्ण रेल्वे तिच्यावरून गेली. हा प्रसंग पाहून उपस्थित नागरिकांच्या अंगावर काटा आला. सुदैवाने रेल्वे गेल्यानंतर महिला सुरक्षित बाहेर आली आणि तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिलेला वाचताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. पाटस स्थानकावर पादचारी पूल नसल्यामुळे प्रवाशांना रोजच जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. योग्य सुविधा नसल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी केली असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ