Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’तील अफझल बेगमच्या त्या थरारक सीनमागचं सत्य आलं समोर

spot_img

अभिनेत्री दिशा परदेशीने रितेश देशमुखचे मानले आभार; जीव धोक्यात घालून चित्रीत केला मृत्यूचा प्रसंग!

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत असून, त्यातील ऐतिहासिक प्रसंगांची आणि भव्यतेची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात सलमान खान, संजय दत्त यांसारख्या दिग्गजांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली असली तरी, अभिनेत्री दिशा परदेशी हिने साकारलेला एक सीन सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.

चित्रपटात दिशाने अफझल खानाच्या पत्नीची म्हणजेच ‘अफझल बेगम’ची भूमिका साकारली आहे. तिच्या मृत्यूचा सीन चित्रीत करण्यासाठी दिशाला तब्बल १२ तास पाण्यात राहावे लागले होते. या सीनमध्ये तिला खोल पाण्यात फेकले जाते. अंडरवॉटर चित्रीकरण करणे आणि श्वासावर नियंत्रण ठेवून अभिनयातील ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ दाखवणे हे दिशासाठी मोठे आव्हान होते.

दिशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या कठीण प्रवासाचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, “पाण्याखाली अभिनय करणे आणि तासन्तास श्वास रोखून धरणे सोपे नव्हते. पण रितेश सरांनी आम्हाला आधीच इतके उत्तम ट्रेनिंग दिले होते की, सेटवर आम्हाला पूर्णपणे सुरक्षित वाटत होते. सुरक्षेपासून ते तांत्रिक बाबींपर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन इतके अचूक होते की, हा कठीण सीन आम्ही सहज पूर्ण करू शकलो.”

रितेश देशमुख गेल्या १० वर्षांपासून ‘राजा शिवाजी’ हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. तीन वेळा अपयश आल्यानंतरही जिद्द न हारता १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाने केवळ मोठी कमाईच केली नाही, तर तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या कठीण सीनमुळे दिशा परदेशीचे कौतुक होत असून, रितेशच्या दिग्दर्शकीय दृष्टीचीही सर्वत्र प्रशंसा होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ