Akshay kumar : ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया; ‘भूत बंगला’च्या यशानंतर अभिनेत्याने घेतला कामातून सक्तीचा ब्रेक!

spot_img

व्हिजन करेक्शनसाठी पार पडली सर्जरी; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला, शूटिंगचे वेळापत्रक पुढे ढकलले

बॉलिवूडचा सर्वात व्यग्र अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारला प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपटसृष्टीतून छोटासा ब्रेक घ्यावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दृष्टीशी संबंधित समस्या जाणवत असल्याने अक्षयने ६ मे रोजी डोळ्यांची ‘व्हिजन करेक्शन’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सध्या अक्षयचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत असतानाच ही बातमी समोर आली आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याला अतिप्रकाश आणि धुळीपासून लांब राहण्याचा तसेच काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया करण्याच्या अवघ्या काही तास आधी अक्षयने अनीस बाज्मी दिग्दर्शित ‘केरळम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे शेड्युल पूर्ण केले होते. या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग काही काळासाठी लांबणीवर पडले असून, प्रकृतीत सुधारणा होताच तो पुन्हा एकदा विद्या बालन आणि राशी खन्ना यांच्यासोबत सेटवर परतणार आहे. आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने चाहत्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले असून, तो लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘गोलमाल ५’ सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ