Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेला ब्रेक, सत्ता स्थापनेचा पेच कायम

spot_img

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत राज्याच्या राजकारणात मोठी एंट्री केली आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्यामुळे पक्षाने प्रभावी कामगिरी नोंदवली असली, तरी सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले स्पष्ट बहुमत अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालात टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या. मात्र विजय थलपती दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार असून त्यामुळे पक्षाची ताकद 107 वर येणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने हा आकडा 112 पर्यंत पोहोचला आहे. तरीही बहुमतासाठी अजून सहा आमदारांची आवश्यकता असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर टीव्हीकेने सरकार स्थापनेचा दावा करत राज्यपालांकडे बहुमताचे पत्र सादर केले आहे. मात्र उपलब्ध संख्याबळावर राज्यपाल पूर्णपणे समाधानी नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विजय यांच्या शपथविधीला काही काळ विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांनी टीव्हीकेसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणे किंवा इतर पक्ष व अपक्ष आमदारांचा अधिकृत पाठिंबा मिळवण्याचे पर्याय ठेवले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत तामिळनाडूच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ