ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील तळ्यात बुडून सख्ख्या जुळ्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.५ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याची सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे तळेरान आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रावणी रामदास साबळे,गणेश रामदास साबळे दोघांचे (वय ११ वर्ष, रा.तळेरान,ता.जुन्नर,जि.पुणे) अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या भावा, बहिणीचे नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की,मंगळवारी दि.५ रोजी श्रावणी साबळे व गणेश साबळे यांची मोठी बहिण कपडे धुण्यासाठी येथील तळ्याकडे गेली होती,त्या वेळी श्रावणी व गणेश ही दोन्ही भावंडेही तिच्याबरोबर तळ्याकडे गेले होते. मात्र दोन्ही भावंडांनी,त्यांच्या मोठ्या बहिणीची नजर चुकवून ते तळ्यातील पाण्यात गेले व तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले.सदर घटनेची माहिती मिळतच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही पाण्याबाहेर काढून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणीसाठी आणण्यात आले.येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत गोरे व डॉ.वैष्णवी ठिकेकर यांनी तपासणी करून,त्यांना मृत घोषीत केले. दोघांचे शेवविच्छेदन करून, त्यांचे मृतदेह नातेवाईकांची ताब्यात देण्यात आले.




