Baramati By-Election Results 2026 : बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय; पोटनिवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी

spot_img

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या महत्त्वाच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रचंड आघाडी घेत विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत ही परंपरा कायम ठेवली आहे. मतमोजणीच्या 19 व्या फेरीअखेर उपलब्ध आकडेवारीनुसार, त्या सुमारे 1 लाख 68 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पोटनिवडणुकीत एवढ्या मोठ्या फरकाने आघाडी घेणारी ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.

या निकालामुळे बारामतीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे चित्र दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या कामगिरीकडे केवळ सहानुभूतीची लाट म्हणून न पाहता, मतदारांनी दिलेला ठोस पाठिंबा म्हणून पाहिले जात आहे. दोन लाखांच्या जवळपास जाणारे मताधिक्य हे त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास दर्शवते. दरम्यान, या निकालानंतर बारामतीसह राहुरी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशे आणि गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या विजयामुळे पक्षाला नवचैतन्य मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

एकूणच, बारामतीतील हा निकाल केवळ पोटनिवडणुकीपुरता मर्यादित नसून राज्याच्या राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ