Pune News : ओतूर ब्राम्हणवाडा रस्त्याजवळ बिबट्या जेरबंद !

spot_img

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

ओतूर ब्राम्हणवाडा रस्त्याजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये, रविवारी दि.३ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे माहिती देताना म्हणाले की,ओतूर ब्राम्हणवाडा रस्त्याजवळ बिबट्याचा वावर असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा,अशी मागणी वनविभागाकडे केली होती. दरम्यान या ठिकाणी पंधरा दिवसांपुर्वी आत्माराम गाढवे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये रविवारी दि.३ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. 

सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक किशन खरोडे,किसन केदार,गणपत केदार यांनी तात्काळ पोहोचून, सदर बिबट्याला ताब्यात घेतले.जेरबंद झालेला बिबट्या हा नर असून,त्याचे वय सहा वर्ष असल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.सदर बिबट्यास स्थानिक नागरिक शेखर गाढवे,ऋषि गाढवे,सचिन ओतूरकर,अनिकेत गाढवे यांच्या मदतीने रेस्क्यू करून, माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे.ओतूर आणि परिसरात बिबट व अन्य वन्य प्राण्यासंबंधित कुठलीही समस्या असल्यास,नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ