Vidhan Parishad Election : काँग्रेसही स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत; गांधीभवनातील बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

spot_img

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क रंगताना दिसत आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची चर्चा जोरात होती, आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांचीही तशीच अपेक्षा होती. मात्र आता परिस्थितीत बदल होताना दिसत असून, आघाडीत एकमत न झाल्याचे संकेत मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांचे नाव पुढे येत असल्याने राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्षही स्वतःचा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात गांधीभवन येथे काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू असून, त्यात विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांसारखे नेते उपस्थित आहेत. या बैठकीतून आगामी रणनीती आणि अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ