Sanjay Raut : महिला आरक्षण विधेयक ठरले ‘भोंदूगिरी’ संजय राऊतांचा केंद्र सरकारवर बोचरा वार!

spot_img

‘मोदी है तो मुमकीन है’ आता दंतकथा; खासदार राऊतांनी भाजपच्या ‘पॉलिटिकल गेम’चा केला पर्दाफाश

लोकसभेत मांडण्यात आलेले नारी शक्ती वंदन विधेयक पुरेसे बहुमत नसल्याने कोसळले आणि यावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. या अपयशानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “मोदी है तो मुमकीन है” हे जुमले आता इतिहासजमा झाले असून, सरकार फक्त ‘नमकीन’ भाषणे देऊन लोकांची दिशाभूल करत आहे. महिलांना खरोखर आरक्षण देण्याचा सरकारचा हेतूच नव्हता, तर या विधेयकाच्या नावाखाली जागांची संख्या ५४३ वरून ८५० करून सत्तेचा अमरपट्टा मिळवण्याचे हे एक छुपे षडयंत्र होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

राऊतांच्या मते, हे विधेयक म्हणजे केवळ ‘डिलीमीटेशन बिल फॉर अनफेअर व्हिक्टरी’ होते. महिलांच्या नावाखाली उत्तर विरुद्ध दक्षिण असा प्रादेशिक वाद आणि स्त्री विरुद्ध पुरुष असा सामाजिक संघर्ष पेटवण्याचा भाजपचा डाव होता. जर सरकारला खरोखरच महिलांना न्याय द्यायचा असता, तर सध्याच्या ५४३ जागांमध्येच ३३ टक्के आरक्षण लागू करता आले असते, ज्याला सर्वच विरोधकांनी पाठिंबा दिला असता. मात्र, स्वतःच्या पुरुष खासदारांच्या जागा वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आणलेली ही ‘भोंदूगिरी’ संसदेने उधळून लावली आहे, अशा कडक शब्दांत राऊतांनी सरकारचा समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ