Sara Arjun and Dhanush : धनुषसोबत २० वर्षांच्या साराचा रोमान्स? वयातील २२ वर्षांच्या अंतरामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

spot_img

रणवीर सिंहनंतर आता साऊथ सुपरस्टारसोबत जमणार जोडी; ‘जगा आणि जगू द्या’ म्हणत सारा अर्जुनने सुनावले खडे बोल

बॉलिवूड असो वा दाक्षिणात्य सिनेसृष्टी, मोठ्या वयाचा अभिनेता आणि कमी वयाची अभिनेत्री हे समीकरण नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंहसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री सारा अर्जुन सध्या अशाच एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘धुरंधर’मध्ये साराने रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारली होती, तेव्हा त्यांच्यातील २० वर्षांच्या अंतरामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला होता. आता सारा अर्जुन पुन्हा एकदा तिच्यापेक्षा वयाने तब्बल २२ वर्षांनी मोठ्या असलेल्या साऊथ सुपरस्टार धनुषसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. सारा सध्या २० वर्षांची असून धनुष ४२ वर्षांचा आहे, यावरून नेटिझन्सनी पुन्हा एकदा या जोडीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक तमिलरसन पचमुथू यांच्या आगामी चित्रपटात ही जोडी एकत्र दिसण्याची शक्यता आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ‘कांतारा’ फेम रुक्मिणी वसंत होती, मात्र तारखांच्या अभावामुळे ही ऑफर सारा अर्जुनकडे आली. सारा आणि धनुष पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता असली, तरी वयातील तफावतीवरून मात्र टीकेची झोड उठत आहे. साराने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि अवघ्या २० व्या वर्षी ती एक मोठी स्टार बनली आहे. ती दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते राज अर्जुन यांची कन्या असून ‘धुरंधर’मधील यलिनाच्या भूमिकेने तिला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.

वयातील अंतरावरून होणाऱ्या या टीकेला साराने अत्यंत संयमी पण रोखठोक उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, “हा सर्व गोंधळ केवळ सोशल मीडियावरच सुरू आहे आणि मी तिथे फारशी सक्रिय नसते. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते, पण माझा ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर विश्वास आहे.” चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून वयातील हे अंतर महत्त्वाचे होते आणि त्याबद्दल आपल्याला पूर्ण कल्पना होती, असेही तिने स्पष्ट केले. लोकांच्या मतांमुळे आपल्या विचारांत किंवा कामात कोणताही फरक पडणार नसल्याचे साराने ठणकावून सांगितले आहे. आता ही नवी जोडी पडद्यावर कशी केमिस्ट्री रंगवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ