spot_img

Ram Shinde : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या आरोपांना भाजप आमदार राम शिंदे यांचं तिखट प्रत्युत्तर

spot_img

रोहित पवारांनी पासपोर्ट आणि शस्त्र परवान्यासाठी केली मदत?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणात भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde) यांच्यावर पासपोर्ट आणि शस्त्र परवाना देण्यात मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता. याला आज राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत रोहित पवारांवरच उलट आरोप केले. त्यांनी रोहित पवारांच्या आरोपांना ‘बिनबुडाचे, आधारहीन आणि खोटे’ ठरवले आणि निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यात रोहित पवारांची भूमिका असल्याचा दावा केला.राम शिंदे म्हणाले, “रोहित पवारांनी माझ्यावर पासपोर्ट दिल्याचा आरोप करताना माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केला. पण वास्तविकता ही आहे की निलेश घायवळला २०२० मध्ये पासपोर्ट मिळाला. त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, हा पासपोर्ट मिळवण्यासाठी रोहित पवारांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत प्रयत्न केले.

दुसऱ्यांवर बोटं तोडण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःच्या या कारवायांबद्दल उत्तर द्यावं.” तसेच, “आम्ही कधीच मदत केली नाही. चर्चेत राहण्यासाठी रोहित पवार अशी नावं घेतात, आता ते त्यांच्या तोंडावर पडले आहेत. पासपोर्टच्या मुद्द्यावर ते खोटं बोलत आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याच्या आरोपावर बोलताना राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा उल्लेख करत म्हटलं, “परवान्याचा निर्णय कदम यांच्या अधिकारक्षेत्रात आहे आणि ते स्वतंत्रपणे चांगलं काम करत आहेत. यात कोणाचीही मदत नाही.

रोहित पवारांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत.” याशिवाय, त्यांनी रोहित पवारांवर जिल्ह्यातील राजकीय गुन्ह्यांचा आरोप करत म्हटलं, “मी मंत्री असताना रोहित पवारांनी पहिल्यांदा निलेश घायवळला जामखेडला आणलं. त्यांच्या बैठका झाल्या, कैटुंबिक संबंध आहेत. त्यांच्यातील भांडण देणाघेण्यावरून की रिअल इस्टेटवरून, हे त्यांनाच माहीत. आमच्या भागात निलेश आणि सचिन घायवळांच्या फोटोंसह बातम्या आल्या होत्या की, त्यांच्या मदतीमुळेच ग्रामपंचायती निवडून आल्या.”पुढे बोलताना राम शिंदे यांनी म्हटलं, “त्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना मारहाण करून सभापतीपदी बसवण्यात आलं, हे तालुक्यात सर्वांना माहीत आहे. मीही तेव्हा आरोप केले होते. हाणामारी करून सदस्यांना पळवण्यात रोहित पवारांची भूमिका होती.

निलेश घायवळ सामाजिक कार्यासाठी सोबत असतो तेव्हा चांगला, पण प्रचारात आला की गुंड. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस नेहमीच गुंडच असतो.” निलेश घायवळशी संबंध असल्याच्या शंकेवर शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सांगितलं, “माझा आणि निलेशचा दूरदूरांपर्यंत संबंध नाही. मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्याच्यावर मकोका लावला होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी रोहित पवारांनीच मदत केली होती.” हे प्रकरण आता आणखी तापलं असून, दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर अधिक उफाळून येऊ शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ