spot_img

Israel War : मध्यपूर्वेत तणाव टोकाला; इराण-अमेरिका संघर्षामुळे जगभर परिणाम

spot_img

मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने जागतिक पातळीवर मोठे परिणाम घडवले आहेत. हे युद्ध केवळ या देशांपुरते मर्यादित न राहता जगातील अनेक देशांवर त्याचे थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहेत.

इराणने महत्त्वाची होर्मुझची सामुद्रधुनी खाडी बंद केल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली असून अनेक देशांमध्ये आर्थिक तणाव वाढला आहे.

या संघर्षात ऊर्जा प्रकल्पांवरही हल्ले सुरू झाले आहेत. इराणच्या गॅस प्रकल्पांवर हल्ल्यानंतर त्यांनी कतार आणि संयुक्त अरब अमिरातील प्रकल्पांना लक्ष्य केले, ज्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. अमेरिकेने या हल्ल्यांबाबत अनभिज्ञता व्यक्त करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, अमेरिकेने चीन, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले, मात्र कोणताही देश थेट सहभागासाठी तयार झालेला दिसत नाही.

दरम्यान, इस्रायल आणि दक्षिण सीरियामधील लष्करी ठिकाणांवर हल्ले करत परिस्थिती आणखी तापवली आहे. विशेषतः अस-सुवैदा भागातील लष्करी तळ आणि कमांड सेंटर लक्ष्य करण्यात आले. या कारवाईमागे स्थानिक संघर्षांना उत्तर देण्याचा दावा केला जात आहे. सध्याच्या घडीला वाढता तणाव, वाढती आक्रमकता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तटस्थ प्रतिसाद पाहता, हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ