spot_img

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचे रुपाली चाकणकरांवर पुन्हा गंभीर आरोप !

spot_img

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून राजकारण अधिक तापले असून, आता या प्रकरणात नवे आरोप समोर आले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी दावा केला की, या प्रकरणातील एका पीडितेने दिलेल्या माहितीनुसार चाकणकर या तंत्र-मंत्राशी संबंधित काही कृतींमध्ये सहभागी होत्या. त्यांनी असा आरोपही केला की, 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापली होती. या दाव्याला पुष्टी देण्यासाठी अंधारे यांनी काही छायाचित्रेही माध्यमांसमोर सादर केली. त्या फोटोमध्ये चाकणकर यांच्या हाताच्या अनामिकेला पांढऱ्या कापडाने बांधलेले दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, अंधारे यांनी तंत्र-मंत्र विद्येत अनामिकेचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, या बोटाचा संबंध सूर्य आणि शुक्र ग्रहांशी जोडला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बोटाचा वापर ऊर्जा प्रवाह वाढवण्यासाठी, मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी किंवा विशिष्ट क्रिया करण्यासाठी केला जातो, अशी माहिती त्यांनी अभ्यासातून समजल्याचे सांगितले. दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणावर पुढे काय प्रतिक्रिया येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ