spot_img

Rupali Thombre : महिला आयोग अध्यक्षांची पाद्यपूजा भोवली? रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांना केलं ‘टार्गेट’

spot_img

नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्या अटकेने संपूर्ण राज्याच्या राजकारणात आणि समाजमनात मोठी खळबळ उडाली आहे. लष्करी गणवेशाचा आडोसा घेऊन बुवाबाजी करणाऱ्या या नराधमावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असून, महिलांच्या शोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आता SIT कडे सोपवण्यात आला असून, डिजिटल फॉरेन्सिकच्या माध्यमातून खरातच्या काळ्या कृत्यांचे पुरावे गोळा केले जात आहेत. त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले पिस्तूल आणि जिवंत काडतुसे यामुळे या भोंदूचे गुन्हेगारी कनेक्शन अधिक गडद झाले असून, तो भक्तांना धमकावण्यासाठी शस्त्राचा वापर करत होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे प्रकरण केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता आता राजकीय वादाचे केंद्र बनले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विशेषतः रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर ‘रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली’ अशी पोस्ट टाकून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खरातचे जाळे केवळ भक्तांपर्यंतच मर्यादित नसून, अनेक बडे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत त्याने कोट्यवधींचे जमिनीचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. सिन्नर, शिर्डी आणि ओझर विमानतळ परिसरात या भोंदूने बांधकाम व्यावसायिकांशी भागीदारी करून जमिनी हडप केल्याचे गंभीर आरोप होत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ