‘धुरंधर-द रिव्हेंज’सोबत खास प्रदर्शन; 18 मार्चपासून प्रेक्षकांना मिळणार पहिली झलक.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा दमदार फर्स्ट लूक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे, ही पहिली झलक फक्त चित्रपटगृहांमध्येच अनुभवता येणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा टीझर ‘धुरंधर द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत प्रदर्शित केला जाणार आहे. 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या पेड प्रिव्ह्यूदरम्यान प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक सिनेमाची पहिली झलक मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.
या चित्रपटातरितेश विलासराव देशमुख प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाला सिनेमॅटिक स्वरूप देण्याचा भव्य प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे.
संगीतासाठी अजय-अतुल सिवन जोडलेली लाभली आहे, तर प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या जादूने या ऐतिहासिक कथेला नेत्रदीपक रूप दिले आहे.
भाषा आणि प्रदेशांच्या सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभर पोहोचवण्याचा निर्मात्यांचा मोठा उद्देश आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’चा हा फर्स्ट लूक टीझर प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि लक्षवेधी अनुभव ठरणार आहे.




