शुभमन गिलच्या फलंदाजीला आली धार
सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर असून दोन कसोटी सामने भारत व वेस्ट इंडिजमध्ये खेळले जात आहेत. त्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून दुसरा कसोटी सामना सध्या खेळला जात आहे. या सामन्याच्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलची (Shubman Gill) शुभमन गिल रचणार इतिहास ? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार दुसरा कर्णधार मोठी चर्चा सुरू आहे. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार झाल्यापासून शुभमन गिलच्या फलंदाजीला आणखी धार आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याने कमी धावा काढल्या असल्या तरी, इंग्लंडमधील मागील मालिकेत त्याने जास्त धावा केल्या आणि अनेक विक्रम मोडले. गिल आता पुढच्या सामन्याची वाट पाहत आहे. त्यात त्याला आणखी एक कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. अनेक फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचले आहेत. परंतु त्यात ते अयशस्वी ठरले आहेत. शुभमन गिल कदाचित तो मोडू शकणार नाही. परंतु असा विक्रम करणारा तो सर डॉन ब्रॅजमननंतरचा दुसरा कर्णधार नक्कीच होईल, अशी अपेक्षा आहे.
जगातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन त्यांच्या संघाचे कसोटी कर्णधार झाले तेव्हा त्यांनी सर्वात कमी डावांमध्ये 1 हजार धावा केल्या होत्या. तेव्हापासून, कोणीही हा विक्रम मोडू शकलेला नाही. हा विक्रम जवळजवळ अशक्य असाच आहे. शुभमन गिल देखील हा विक्रम कदाचित मोडू शकणार नाही, परंतु सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) नंतर गिल सर्वात जलद 1 हजार कसोटी धावा करणारा कर्णधार बनेल हे निश्चित आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी कर्णधार झाल्यानंतर फक्त 11 डावात 1 हजार धावा केल्या होत्या. सर डॉन ब्रॅडमन नंतर अनेक कर्णधार या विक्रमाच्या जवळ पोहोचले पण तो मोडू शकले नाहीत. श्रीलंकेचा कामेंदु मेंडिस देखील एकदा खूप जवळ आला होता, परंतु तो देखील त्यात अपयशी झाला.
शुभमन गिलने कसोटी कर्णधार झाल्यानंतर त्याच्या पहिल्या 9 कसोटी डावात 754 धावा केल्या. त्यानंतर जेव्हा तो वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरला तेव्हा, त्याने 50 धावा जोडल्या. याचा अर्थ त्याने आता त्याच्या पहिल्या 10 डावात 805 धावा केल्या आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी अर्थात गिलला 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 196 धावांची आवश्यकता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल असे म्हटले जात आहे. जर तसे झाले तर गिलच्या बॅटमधून आणखी एक मोठी खेळी फार दूर नाही. गिलने गेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी केली नव्हती. दरम्यान, गिलला सर्वात जलद 1 हजार कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय कर्णधार बनण्याची संधी देखील मिळेल, हे काम त्याच्यासाठी फारसे कठीण वाटत नाही.




