spot_img

Navi Mumbai Crime : ऐरोलीत भीषण अपघात; जेसीबीच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

spot_img

नवी मुंबई:विजय गायकवाड

नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 15 परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. जेसीबी रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास न्यू होरायझन स्कूलजवळ जेसीबी (MH-05-BQ-250) रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या बजाज अवेंजर (MH-43-AY-0966) या दुचाकीची त्याला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दिग्विजय बाबासाहेब दिंडे (वय 17, रा. ऐरोली सेक्टर 4) आणि हर्षद सावर्डेकर (वय 18, रा. ऐरोली) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एसीपी राहुल धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक शाम बनसोडे तसेच इतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

या प्रकरणी जेसीबी चालक हनुमंत शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ