spot_img

Bhandara Crime : भंडाऱ्यात 17 वर्षीय तरुणी बेपत्ता; वडिलांनी दाखल केली अपहरणाची तक्रार

spot_img

मामाच्या घरातून गावी निघालेली मुलगी घरी पोहोचलीच नाही; मोबाईलही बंद.

भंडारा जिल्ह्यातील एका 17 वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. दोन दिवसांपासून मुलगी सापडत नसल्याने तिच्या वडिलांनी पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.

बारावीची परीक्षा संपल्यानंतर ही तरुणी नांदोरा येथील मामाच्या घरी राहायला गेली होती. त्यानंतर ती तुमसर तालुक्यातील सोरना या आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती घरी पोहोचली नाही. तिचा मोबाईल फोनही बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा काहीच पत्ता लागला नाही.

अखेर वडिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ